साहस Times . माझे मूळगांव यवतमाळ जिल्हातील तालुका – मारेगांव ( रोड ) हे असून ह्याच गावातून अठराविश्व दारिद्र्यासारख्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जिद्द, चिकाटी आणि उच्च शिक्षणाच्या बळावर उच्चपदावर विराजमान झालेला आणि संघर्षातून यशाचे सर्वोच्च शिखर गाठणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे आद.हेमंत लता शंकर बुजाडे हे होत.
. युपीएससी ( UPSC ) द्वारे घेतली जाणारी CAPF ( Central Armed Police forces ) परीक्षा उत्तीर्ण होऊन All India Rank (Air ) मिळवणे म्हणजे थेट केंद्र सरकारच्या ग्रुप – ‘ A ‘ राजपत्रित ( Gazetted ) अधिकारी म्हणजेच सहाय्यक कंमाडट ( Assistant Commandant ) पदी निवड होणे होय. हे पद देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत अत्यंत मानाचे व जबाबदारीचे मानले असून तेच आद.हेमंत लता शंकर बुजाडे ह्यांनी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त केले आहे.
. आद.हेमंत लता शंकर बुजाडे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांच्या तत्त्वज्ञानाची कास मनी धरून तब्बल 12 तास नियमित अभ्यास व पार्टटाईम नोकरी करुन यातच आपला उदरनिर्वाह करून चंद्रमौळी झोपडीतून ‘ क्लास वन ‘ सरकारी अधिकारी बनलेत. आणि देशातील सर्वोच्च परीक्षेला यशस्वी गवसणी घालून यशोशिखर प्राप्त केले.
. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शासनकर्ती जमात बनण्याचा संदेश म्हणजे समाजातील शोषित, वंचितांनी केवळ अनुयायी न राहता राजकारण, प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च स्थानी पोहोचणे होय. उच्च पदावर आरुढ होऊन स्वतःच्या अधिकाराचे व देशाचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच समाज परिवर्तनासाठी प्रशासकीय , कायदेविषयक आणि राजकीय उच्चपदावर आपल्या समाजातील लोकांनी अधिकार मिळवणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण आणि अधिकाराच्या बळावर प्रशासकीय उच्च पदावर आरुढ व्हा ! ज्ञान आणि उच्च शिक्षण हेच शासनकर्ती जमात बनण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन आद. हेमंत लता शंकर बुजाडे ह्यांनी देशातील उच्चपद मानणारे हाशील केले आहेत. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि फुलांचा वर्षाव – मिरवणूक सर्वधर्मीय जनतेकडून आणि लोकप्रतिनिधी कडून होत असून त्यांच्या पायाखाली आता लोळणं घेत आहे.
. आद.हेमंत लता शंकर बुजाडे ह्यांनी गरिबी आणि अपुऱ्या सुविधावर मात करून सातत्याने अभ्यास व मेहनत करून कितीही संकटे आली तरी न डळमळता , न खचता ध्येयाचा पाठपुरावा करून आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःचे व कुटुंबाचे आपल्या कर्तुत्वाने प्रशासकीय क्षेत्रात सन्मानाचे स्थान मिळविले. हे विशेष आहे.
अंधारातुन प्रकाश दिला
शिकून मोठा करण्या धीर दिला
भीमाच्या उपकाराने आज
यशोशिखर आम्ही काबीज केला
दि. 10 ऑगस्ट 26
लेखक –
हंसराज कांबळे ✍️
8626021520
