Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रपालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १० मध्ये विकासकामांचा धडाका; नगरसेविका मनीषाताई तिकोटे...

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १० मध्ये विकासकामांचा धडाका; नगरसेविका मनीषाताई तिकोटे यांचा पुढाकार

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १० मध्ये विकासकामांचा धडाका; नगरसेविका मनीषाताई तिकोटे यांचा पुढाकार

अकलूज | प्रतिनिधी :- अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे तसेच उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १० मधील कर्तव्यदक्ष नगरसेविका मनीषाताई मोहन तिकोटे यांच्या नेतृत्वाखाली पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

वारकऱ्यांचे तसेच स्थानिक नागरिकांचे कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रभागातील प्रमुख रस्ते, पालखी मार्ग आणि परिसरातील आवश्यक ठिकाणी विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी बोरवेल पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व नूतनीकरणाची कामेही करण्यात आली.

परिसरातील स्वच्छता, रस्त्यांची देखभाल, पाणीपुरवठा व्यवस्था आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कामांमुळे वारकरी, नागरिक तसेच व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून नगरसेविका मनीषाताई तिकोटे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

यापुढेही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी अशाच प्रकारे सातत्याने काम करण्यात येईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments