Friday, August 14, 2026
Homeफलटणवडले येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; जि.प. सदस्या वैशाली कांबळे...

वडले येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; जि.प. सदस्या वैशाली कांबळे यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस

वडले येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; जि.प. सदस्या वैशाली कांबळे यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस

फलटण | प्रतिनिधी :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत फलटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वडले येथे आज जिल्हा परिषद बरड गटाच्या सदस्या सौ. वैशाली कांबळे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थित पालकांनी मोठ्या संख्येने आपल्या पाच वर्षांखालील बालकांना लसीकरणासाठी आणत मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बालकांचे लसीकरण करत पालकांना पोलिओ प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी सौ. वैशाली कांबळे म्हणाल्या, “पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ लसीचा डोस पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील मुलांना पोलिओचे दोन थेंब देऊन या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रत्येक बालकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

आरोग्य विभागाच्या वतीनेही नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिओसारख्या गंभीर आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

“प्रत्येक थेंब अनमोल – पोलिओमुक्त भारताकडे एक पाऊल!” हा संदेश देत बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व पालक यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments