Saturday, September 12, 2026
Homeसातारापावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर तत्काळ मदतीचे पाऊल – राजे गट कार्यरत– प्रतिनिधी...

पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर तत्काळ मदतीचे पाऊल – राजे गट कार्यरत– प्रतिनिधी : उमेश काकडे

फलटण प्रतिनिधी  उमेश काकडे :- (ता. २५ मे) – सध्या फलटण शहरात व परिसरात मुसळधार पावसामुळे विविध भागांत समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार, राजे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आपल्या-आपल्या प्रभागात फिरून नागरिकांच्या समस्या समजून घेत आहेत आणि तातडीची मदत पोहोचवत आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत शासनाच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून मदत कार्य राबवले जात आहे. नागरिकांना अडचणीतून सावरण्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. पावसामुळे घरात पाणी शिरणे, रस्त्यांची खराब अवस्था, झाडांची पडझड अशा समस्यांवर त्वरित उपाययोजना केली जात आहे.

या कार्यात सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार श्री. दीपक चव्हाण हे देखील सक्रिय असून, त्यांनी शहरातील विविध भागांना भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.

फलटण शहरातील नागरिकांनी पावसामुळे काही अडचण निर्माण झाल्यास, राजे गटाचे स्थानिक प्रमुख कार्यकर्ते व माजी नगरसेवक यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मदत कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राजे गट पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनी कुठल्याही संकोच न करता आपली समस्या मांडावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments