[ad_1]
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील कमला नगर येथील एका व्यापाऱ्याच्या खात्यातून एका रात्रीत तब्बल ३० लाख रुपये गायब झाले आहेत. सकाळी उठून त्यांनी मोबाइल तपासला असता त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तत्काळ बँक गाठली व अकाऊंट ब्लॉक करत ऑनलाइन तक्रार केली. सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले. त्यानंतरही पुढे काय करायचे हे कोणीच सांगितले नाही. खात्यातून पैसे कसे उडवले ? चूक कुठे झाली? गुरुवारी पीडिताने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची विनंती केली.
[ad_2]
Source link
