Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशप्रियकराचं ऐकून सासऱ्याला विष देऊन केलं ठार, एका महिन्यानंतर पोलीस स्टेशन गाठलं;...

प्रियकराचं ऐकून सासऱ्याला विष देऊन केलं ठार, एका महिन्यानंतर पोलीस स्टेशन गाठलं; म्हणाली…; अधिकारी चक्रावला

[ad_1]

बिहारच्या मुझफ्फरपूर येथे एका महिलेने प्रियकराच्या सांगण्यावरुन आपल्या सासऱ्याची हत्या केली. सूनेने सासऱ्याच्या जेवणात विष मिसळून त्याला ठार केलं होतं. मात्र हत्येच्या एका महिन्यानंतर तिने एसएसपी ऑफिस गाठलं आणि आपला गुन्हा कबूल केला. आपल्याला प्रियकराने विष आणून दिलं होतं असं तिने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, पुढील कारवाई सुरु केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारीला करजा पोलीस ठाण्याच्या गोपालपूर गावातून 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. याप्रकरणी मृत प्रकाश पासवान यांची सून सोनी कुमारी यांनी सासऱ्यांना विष दिल्याचं कबूल केलं आहे. मृत प्रकाश पासवान यांचा मुलगा आणि इतर लोकही एसएसपी कार्यालयात पोहोचले होते. त्यांनी आरोपी सूनेविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. 

सोनी कुमारीने आपल्या कबुली जबाबात म्हटलं आहे की, तिचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. प्रियकराने तिच्याशी बोलण्यासाठी मोबाईल खरेदी करुन दिला होता. सासऱ्यांना मारण्यासाठी प्रियकरानेच विष आणून दिलं होतं. हे विष नंतर जेवणात मिसळण्यात आलं. 

मृत व्यक्तीच्या मुलाने सांगितलं आहे की, तो आसाममध्ये गाडी चालवण्याचं काम करतो. घऱी पत्नी आणि वडील राहत होते. गावातील एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. प्रियकराच्या सांगण्यावरुन पत्नीने माझ्या वडिलांनी हत्या केली आहे. 

याप्रकरणी एसपी ग्रामीण विद्यासागर यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी करजा परिसरात एक व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पहिल्या दिवसापासून हे प्रकरण संशयास्पद होतं. याचं कारण विषाचं सेवन झाल्याने मृत्यू झाला होता. काल अचानक सूनेने येऊन मीच विष दिल्याचं मान्य केलं. राणा पासवान नावाच्या व्यक्तीने विष आणून दिलं होतं. तो महिलेचा प्रियकर आहे. आधी महिलेने आपल्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आणि नंतर आपला गुन्हा मान्य केला. तिला अटक करण्यात आली आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments