Tuesday, August 11, 2026
Homeदेश-विदेशपाकिस्तानला चीनची साथ नाहीच, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर चीनची भूमिका काय?

पाकिस्तानला चीनची साथ नाहीच, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चीनची भूमिका काय?

पाकिस्तानला चीनची साथ नाहीच, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चीनची भूमिका काय?

[ad_1]

Operation Sindoor:  पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मध्यरात्री भारतानं दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जगातील अनेक मोठ्या महाशक्ती भारताच्या पाठिशी असल्याचंच दिसत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अनेक वर्षांपासूनच आहे. तसंच हा संघर्ष लवकर संपले अशी आशा असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर भारताच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं कोणतीही कृती करण्याचा विचार करू नये, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी पाकिस्तानला बजावलं आहे.

अमेरिकेनं पाकला बजावलं

भारताच्या कारवाईविरोधात कोणतीही कृती करण्याचा पाकिस्ताननं विचार करू नये. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा भारताला अधिकार होता. त्यामुळे भारताला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं कोणतीही योजना आखू नये. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा करत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंनी फटकारलं. भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर भारताला जगभरातून समर्थन मिळत आहे. अमेरिकेनं पाकिस्तानला बजावल्यानंतर आता इस्त्रायलनं देखील भारताचं समर्थन केलं आहे.

इस्त्रायलकडून भारताचं समर्थन

भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे इस्रायल समर्थन करतो. निरपराध लोकांवर केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर लपण्यासाठी कुठेही स्थान मिळणार नाही, याचा धडा दहशतवाद्यांना मिळालाच पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर चीन पाकिस्तानची साथ देईल अशी शक्यता होती. मात्र, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चीननं आपली भूमिका बदलल्याचं दिसत आहे.

चीनची भूमिका काय?

आम्हाला सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान हे चीनच्या शेजारी आहे. दहशतवाद जगासाठी धोकादायक आहे. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेवर भारतानं एअर स्ट्राईक केल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे. भारतानं केलेला हल्ला दहशतवाद्यांवर नसून तो सर्वासामान्य जनतेवर केल्याचं पाकिस्तानला जगाला दाखवायचं होतं. मात्र, भारतानं दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना अचूक टार्गेट करत त्यांचा खात्मा केला. याचं ब्रिफिंग देखील भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी केलं आहे. त्यामुळेच भारताला जगातील शक्तिशाली देशांनी समर्थन देत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments