Friday, September 4, 2026
Homeसाताराधक्कादायक! कर्ज देत नसल्याच्या कारणावरुन बँक मॅनेजरवर कोयत्यानं हल्ला, मॅनेजर गंभीर जखमी 

धक्कादायक! कर्ज देत नसल्याच्या कारणावरुन बँक मॅनेजरवर कोयत्यानं हल्ला, मॅनेजर गंभीर जखमी 

धक्कादायक! कर्ज देत नसल्याच्या कारणावरुन बँक मॅनेजरवर कोयत्यानं हल्ला, मॅनेजर गंभीर जखमी 

[ad_1]

Satara News : कर्ज देत नसल्याच्या कारणावरून बँक मॅनेजरवर ( Bank Manager) बँकेतच कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये  बँक मॅनेजर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सातारा जिल्ह्यातील कराडमधील इंडियन ओवरसीज बँकेच्या (Indian Overseas Bank) शाखेत घडली आहे. कराडमधील इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेत बँक मॅनेजर आशिष कश्यप (Ashish Kashyap) यांच्यावर रेठरे बुद्रुक येथील आशुतोष दिलीप सातपुते (Dilip Satpute) याने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेळी पालनासाठी आवश्यक कर्ज देत नाही म्हणत आशुतोष याने बँक मॅनेजर कश्यप यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात बँक मॅनेजर कश्यप हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कराडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments