Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशजोडीदार असावा तर असा! लग्नाच्या एक दिवसपूर्वी वधूचा अपघात, वराने केलं कौतुकास्पद...

जोडीदार असावा तर असा! लग्नाच्या एक दिवसपूर्वी वधूचा अपघात, वराने केलं कौतुकास्पद काम, VIDEO पाहून व्हाल भावूक

जोडीदार असावा तर असा! लग्नाच्या एक दिवसपूर्वी वधूचा अपघात, वराने केलं कौतुकास्पद काम, VIDEO पाहून व्हाल भावूक

[ad_1]

Groom Marries Girl in Hospital Viral Video : प्रेमात पडणे सोपं असतं पण प्रेम निभवणे तेवढंच कठीण असतं. तरुण तरुणी प्रेमात तर पडतात पण कठीण प्रसंगात अनेक वेळा ते माघार घेतात. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. पण फार कमी जोडपी अशी असतात जी प्रेमासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. आपण अनेक वेळा पाहिलं आहे, कठीण प्रसंगात तरुणी खंबीर असतात पण तरुण माघार घेतात. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण म्हणतोय, जोडीदार असावा तर असा. 

जोडीदार असावा तर असा! 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी हॉस्पिटममध्ये बेडवर पडलेली दिसतंय. तिला वधूसारखं सजविण्यात आलंय. या व्हिडीओ तिच्या शेजारी एक तरुण वराच्या वेशात दिसतोय. त्यांच्यासोबत काही अजून मोचकी लोक आहेत. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. हॉस्पिटलमध्ये त्या दोघांचा विवाह होतोय. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या काही एक दिवसापूर्वी तरुणीचा अपघात झाला. तिला या अपघातात जबरदस्त मार बसला आहे. 
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता तरुणी बेडवरुन हालतानाही दिसत नाहीय. तरुणी तरुणीच्या कपाळावर सिंदूर लावताना दिसत आहे. दोघांनी एकमेकांना हार घातला. उपस्थितीत लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

आपण अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला पाहिल्या आहेत, किंवा वाचल्या आहेत. जेव्हा वधूचा अपघात होता किंवा भयानक आरोग्य समस्या जाणवते तेव्हा वराकडून लग्न मोडल जातं. पण या व्हिडीओमधील वराचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना विवाह या चित्रपटाची आठवण करुन देतोय. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील quoteslife_in या हँडल हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. व्हिडीओने मोठ्या संख्येने सोशल मीडिया वापरकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स वधू-वरांचे अभिनंदन करत आहेत.

व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलंय की, ‘आजच भाऊ आम्हाला लग्नाचा चित्रपट बघायला मिळाला.’ दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘या व्यक्तीबद्दल खूप आदर आहे. अभिवादन. यावरून हे सिद्ध झाले की माणूस हवा असेल तर काहीही करू शकतो.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिलंय की, ‘आयुष्यात असा एक जोडीदार असावा, बाकी कशाची गरज नाही.’



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments