साताऱ्यात 5 किलो गांजा. नागपुरात 7 किलो ड्रग्स जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, किंमत किती?

0
3


मुंबई : राज्यात अंमली पदार्थ विरोधी कारवायांना जोर आला असून पोलिसांनी (Police) ड्रग्ज, गांजा तस्करीविरुद्ध मोहीमच हाती घेतली आहे. त्यातच, पुण्यात विषारी दारु, हातभट्टीमुळे 22 जणांचा जीव गेल्यामुळे राज्यभरातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून कारवाईला वेग आला आहे. त्यातूनच, नागपुरात तब्बल 7 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं असून साताऱ्यातही (Satara) 4 किलो 69 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त करुन आरोपींना अटक केली आहे. नागपूरच्या (Nagpur) जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दी 7 किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याने पोलीस कारवाईचं स्वागत होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

नागपूरमध्ये एकीकडे 7 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले असून दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण शहर पोलिसांनीही मोठी कारवाई केली आहे. सातारा पोलिसांनी दोन संशयितांच्या ताब्यातून तब्बल 4 किलो 69 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मोटारसायकल आणि दोन मोबाईलसह एकूण 2 लाख 1 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रावरामोशी पुलाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली असून अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे.

नागपूरमध्ये 7 कोटींचे ड्रग्ज जप्त (Nagpur 7 crore drugs seized)

नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. बाजार मुल्यानुसार 7 कोटी किमतीचे हे ड्रग्स अज्जू नावाच्या आरोपीने बाहेरून विकायला आणले होते, अशी माहिती आहे. त्यासाठी, आरोपीने एडीपील सोसायटी परिसरात भाड्याने फ्लॅट घेतला होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली असून तब्बल 7 कोटी रुपयांचे ड्रग्ज ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा

व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

आणखी वाचा



Source link