Vidhan Parishad Election 2026: राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2026) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आपले जागावाटप निश्चित केले आहे. आज, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून वेगाने उमेदवार जाहीर केले जात आहेत. यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून (Satara-Sangli Vidhan Parishad Election 2026) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharadchandra Pawar) दोन उमेदवार अर्ज भरणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पक्षाकडून अभय जगताप (Abhay Jagtap) आणि बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) हे दोन्ही नेते आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Vidhan Parishad Election 2026: दोन उमेदवारांचे अर्ज भरण्यामागचे मुख्य कारण
शरद पवार गटाकडून अचानक दोन उमेदवारांचे अर्ज भरण्यामागे एक मोठे कारण समोर आले आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार अभय जगताप यांच्या खांद्यावर नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया (Surgery) झाली आहे. त्यामुळे ते सध्या रुग्णालयात (Hospital) उपचार घेत आहेत. या शारीरिक परिस्थितीमुळे प्रत्यक्ष निवडणूक लढवायची की नाही, याबाबत स्वतः अभय जगताप यांच्या मनात कमालीचा संभ्रम आहे. या अनपेक्षित वैद्यकीय परिस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सध्या दोघांचे अर्ज भरून घेत आहे. जर ऐनवेळी जगताप यांनी माघार घेतली, तर पक्षाची अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, नंतर परिस्थितीनुसार एक उमेदवारी अर्ज मागे घेतला जाऊ शकतो.
Vidhan Parishad Election 2026: साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस कायम
दरम्यान, साताऱ्यात शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चर्चेत आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासून आमदार महेश शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील मतभेद कायम असून, त्याचा परिणाम आगामी विधान परिषद निवडणुकीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फलटण येथील सभेपूर्वी महेश शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार केली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी राजकीय वादात न पडता तब्येतीची विचारपूस करत मतदारसंघातील कामावर लक्ष देण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे आमदार महेश शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील मतभेदाचा फटका विधान परिषद निवडणुकीत महायुतीला बसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)
- निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
- उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
- अर्ज माघारीची मुदत- 4 जून
- मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
- मतमोजणी- 22 जून
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा










