Tuesday, August 11, 2026
Homeसातारासंजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा ; शंभूराज देसाई | पुढारी

संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा ; शंभूराज देसाई | पुढारी

संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा ; शंभूराज देसाई | पुढारी

[ad_1]








कराड; पुढारी वृत्तसेवा : खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील दौर्‍यादरम्यान चाळीस आमदारांबद्दल केलेल्या जहाल व्यक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आक्रमक झाले आहेत. उत्पादन शुल्क व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत आमच्यामुळे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनाम द्यावा असे आव्हान दिले आहे.

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये ना. देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन खा. राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. ते म्हणाले, खा. राऊत यांनी केंद्रिय निवडणूक आयोगाबद्दल वापरलेली शिवराळ भाषा आणि विधनसभेतीत सदस्यांना उद्देशून चोरमंडळ असा केलेला उल्लेख याचे पडसात विधीमंडळात उमटले आहेत. जनतेमधूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल विधीमंडळाने घेतली असून त्यांच्यावर हक्कभंग कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी विशेष हक्क समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली असून शुक्रवारी सायंकाळी सहा पर्यंत त्यांना म्हणने सादर करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी नोटीसीला उत्तर दिलेले नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लवकरच भेटणार आहोत असे ना. देसाई म्हणाले.

खासदार राऊत वाचाळ बडबड करत आहेत. काल सातारा येथे ज्या हॉलमध्ये त्यांची सभा झाली त्या हॉलची क्षमता तीनशे ते चारशे लोकांची होती, याहून अधिक लोक आमच्याभोवती जमतात.आमच्या मंत्री पदावर हरकत घणारे आणि आम्हाला चोर म्हणणाने संजय राऊत आमच्या मेहरबानीवर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देवून निवडून येऊन दाखवावे. त्यांच्यामुळेच चाळीस आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले आहेत. ठाकरे यांनी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखले पाहिजे असा सल्ला ना. देसाई यांनी दिला.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments