कराड पाटण मार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ, महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला

0
3


Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील कराड पाटण मार्गावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. साकुर्डी व बेलदरे या दोन गावांच्या हद्दीवर एकाच दिवसात चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. साकुर्डी गावच्या हद्दीत मध्यरात्री चार चाकीतील सराफ व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. तर बेलदरे फाटा येथे एका व्यावसायिक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

चोरीच्या घटनांमुळे कराड तालुक्यातील सुपने तांबवे परिसरात घबराटीचे वातावरण

साकुर्डी गावच्या हद्दीत मध्यरात्री चार चाकीतील सराफ व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. कराड तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस हवालदार गणेश वेदपाठक तपास करत आहेत. तर बेलदरे फाटा येथे एका व्यावसायिक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने लंपास केले आहेत. सदरील चेनस्नॅचिंग करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरा कधी झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र या घटनांमुळे कराड तालुक्यातील सुपने तांबवे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांच सत्र सुरुच, आरोपींना अटक करण्याची मागणी

 

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांच सत्र गेल्या काही दिवसात सुरू आहे. रात्री घरफोडी करुन आरोपी पसार होतात. पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागत नाही. कळंब तालुक्यातील हसेगाव, बोर्डा, मसा, आंदोरा तसेच ढोकी इथ घरफोडी झाली. यामध्ये आरोपींना अटक होत नाही. यामुळं ज्यांच्या घरी चोरी झाली ते लोक आरोपींना अटक होत नाही म्हणून अभिनंदनाचे बॅनर घेऊन गांधीगिरी करत पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. आरोपींना अटक करत मुद्देमाल ताब्यात देण्याची मागणी त्यांनी केली. 

 

 

आणखी वाचा



Source link