परभणी हिंसाचार प्रकरणी कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आज महाराष्ट्र बंद, बंदला संमिश्र प्रतिसाद

0
19
परभणी हिंसाचार प्रकरणी कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आज महाराष्ट्र बंद, बंदला संमिश्र प्रतिसाद


Parbhani Band News : परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी ५० जणांना अटक केली होती. यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली हे. आनंदराज आंबेडकर यांनी परभणीसह महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या पार्श्वभूमीवर आज परभणीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर राज्यभरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.



Source link