मनुष्याच्या सहा शत्रूंमध्ये ‘लोभ” हा एक महत्त्वाचा शत्रू आहे. लोभम्हणजे अतिरिक्त लालसा किंवा अवाजवी मागणी. हा लोभ पैसा,पद, वस्तू किंवा शरीर यांपैकी कशावरही असू शकतो. ढोबळमानानेलोभ आणि लालचीपणा या एकाच गोष्टी आहेत. पण त्यात एकसूक्ष्म फरक आहे; लोभ म्हणजे आहे ते अजून वाढवणे व लालचीपणाम्हणजे दुसऱ्याकडे आहे, ते मिळवण्याची तीव्र इच्छा असणे. यावरएकच उपाय म्हणजे समाधानाची वृत्ती वाढवणे. तुलसीदासजींनी एकप्रसंग लिहिला आहे, त्यात काकभुशुंडीजी पक्षीराज गरुडालाम्हणतात की, “केवळ तुम्हालाच मोह झाला आहे असे नाही. मोठेमोठेलोकही मोह आणि लोभात बुडाले आहेत.’ ‘ग्यानी तापस सूर कबि कोबिद गुन आगार, केहि कै लोभ बिडंबनाकीन्हि न एहिं संसार’ याचा अर्थ असा की, लोभाने मातीमोल केलेनाही असा या जगात माणूस नाही. लोभाला समाधानाची जोड द्याअन्यथा कष्टांचे रूपांतर अशांतीत होईल. मनुष्य सतत अस्वस्थचराहतो.
Source link




