दुर्दैवी.. अडीच वर्षाची चिमुकली खाडीत बुडाली, तिला वाचवायला गेलेले वडीलही वाहून गेले, डोंबिवलीतील घटना

0
19
दुर्दैवी.. अडीच वर्षाची चिमुकली खाडीत बुडाली, तिला वाचवायला गेलेले वडीलही वाहून गेले, डोंबिवलीतील घटना

अडीच वर्षाची चिमुकली खेळताना जवळच वाहणाऱ्या खाडीत पडली व बुडू लागली. आपल्या डोळ्यासमोर मुलगी बुडत असल्याचे पाहून तिच्या वडिलांनी खाडीत उडी मारून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चिमुकलीसह तिचे वडीलही खाडीत बुडाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस व अग्निशमन दलाकडून दोघांचा शोध घेतला जात आहे. डोबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरातील खाडीत ही घटना घडली आहे.

Source link