
शिक्षकांनी वर्गातच आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच गोंदी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शिक्षकांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडल्याचे सांगण्यात येत असून त्याआधारे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





