Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशWeb Portal For Farmers | आता थेट शेतकऱ्यांना देता येणार डाळींची...

Web Portal For Farmers | आता थेट शेतकऱ्यांना देता येणार डाळींची ऑनलाइन ऑर्डर; केंद्र सरकारचे वेब पोर्टल झाले लॉन्च | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आता थेट शेतकऱ्यांना देता येणार डाळींची ऑनलाइन ऑर्डर; केंद्र सरकारचे वेब पोर्टल झाले लॉन्च

आपला देश डाळींच्या बाबतीत आयतींवर (Pulses Import) जास्त अवलंबून आहे. भारताला मागणी पूर्ण करण्यासाठी हरभरा आणि मूग डाळ सोडून इतर सर्व डाळी आयात कराव्या लागतात. हीच बाब लक्षात घेत केंद्र सरकारतर्फे तूरडाळ शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वेब पोर्टल सुरु करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना थेट तूर उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन ऑर्डर देता येणार आहे. 

नवी दिल्ली | भारतीय घरांमध्ये रोजच्या जेवणामध्ये डाळींचा (Pulses) वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मात्र आपला देश डाळींच्या बाबतीत आयतींवर (Pulses Import) जास्त अवलंबून आहे. भारताला मागणी पूर्ण करण्यासाठी हरभरा आणि मूग डाळ सोडून इतर सर्व डाळी आयात कराव्या लागतात. हीच बाब लक्षात घेत केंद्र सरकारतर्फे (Central Government) तूरडाळ शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वेब पोर्टल (Farmer web portal) सुरु करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना थेट तूर उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन ऑर्डर (Online Order) देता येणार आहे.

डाळीच्या उत्पादनामध्ये देशाला 2027 पर्यंत आत्मनिर्भर (Aatmnirbhar) करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. यासाठी काही उपाययोजना आखल्या असून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या सुविधा निर्माण करण्याचे ठरवले आहे. यामध्ये तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. सरकारी संस्था नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) संयुक्त विद्यमाने हे वेब पोर्टल तयार करण्यात आले असून यामध्ये शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. या वेब पोर्टलवर उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावानुसार डाळीची थेट ग्राहकांना ऑनलाईन विक्री करता येणार आहे. यामुळे ग्राहकांना देखील सहज शेतमाल उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments