Uttarakashi tunnel rescue | 17 दिवसांनंतर उत्तरकाशीत सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुटका! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Uttarakashi tunnel rescue | 17 दिवसांनंतर उत्तरकाशीत सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुटका! | Navarashtra (नवराष्ट्र)


17 दिवसांनंतर उत्तरकाशीत सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुटका!

तब्बल  17 दिवसापासून उत्तरकाशीतील सिल्क्यरा बोगद्यात (Uttarakashi tunnel rescue) अडकलेल्या  41 मजुरांची  सुरु असलेल्या अखेर सुटका करण्यात आली आहे. सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ मजुरांची मंगळवारी रात्री सुटका करण्यात आली. ते 17 दिवस बोगद्यात अडकून राहिले. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दरड कोसळल्याने कामगार आत अडकले होते. रेस्क्यू ऑपरेशनच्या अंतिम टप्प्यात रॅट-होल मायनर्स तैनात करण्यात आले होते. त्यांनी भंगारात मॅन्युअली ड्रिलिंग करून बोगद्यात 800 मिमी पाईप टाकले. हे सर्व कामगार उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.

हे सुद्धा वाचा

17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर 41 मजुरांची यशस्वीरित्या सुटका करणारे ऑपरेशन सिल्क्यरा हे बोगद्यामध्ये किंवा खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचे देशातील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन ठरले आहे. यापूर्वी १९८९ मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज कोळसा खाणीतून ६५ कामगारांना दोन दिवस चाललेल्या ऑपरेशननंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.






Source link