Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रउत्तमराव जानकर यांचा माळशिरस तालुक्यात दौरा, नामनिर्देशनाची  जय्यत तयारी

उत्तमराव जानकर यांचा माळशिरस तालुक्यात दौरा, नामनिर्देशनाची  जय्यत तयारी

माळशिरस:  २३ ऑक्टोबर २०२४ – २५४-माळशिरस विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मा. श्री. उत्तमराव जानकर यांचे नामनिर्देशन पत्र सोमवारी, दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी दाखल करण्यात येणार आहे. यानिमित्ताने माळशिरस तालुक्यात गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात मा. श्री. उत्तमराव जानकर यांच्यासोबत युवानेते अर्जुनसिंह मोहिते-पाटील (माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस), ज्येष्ठ नेते बाबाराजे देशमुख (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर) तसेच महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी धर्मपुरी येथील सद्गुरू संत बाळूमामा मंदिरास भेट देऊन दर्शन घेण्यात आले तसेच गोशाळेची पाहणी करण्यात आली. धर्मपुरी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments