
उर्फी जावेद हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही लोकांना उर्फी जावेद हिची फॅशन सेन्स आवडते. तर, काही लोक तिला तिच्या याच फॅशन सेन्समुळे ट्रोलही करतात. अशा चित्रविचित्र फॅशनमुळे अनेकदा तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळत असतात. मात्र, उर्फीला अशा धमक्यांमुळे आता काहीही फरक पडत नाही. ती बेधडकपणे प्रत्येक ट्रोलरला उत्तर देताना दिसते.






