
. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता, अफनानच्या सहकारी असलेल्या प्रविणने हे हत्याकांड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
उडुपी : कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येच्या (Udapi Murder) प्रकरणाचा छडा लावण्यात कर्नाटक पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी एका आरोपीला अटक केली आहे. प्रवीण अरुण चौगले असं आरोपीचं नाव असून तो सांगलीतील रहिवासी आहे. हत्या करण्यात आलेल्या चौघांपैकी 23 वर्षीय अफनानच्या तो प्रेमात होता मात्र, तिने त्याचं प्रेम नाकारल्याने आणि पैशाच्या व्यवहारातून नात्यात वितुष्ट आल्याने त्याने तिची हत्या केली. यावेळी तिच्या बचावासाठी आलेल्या आई आणि दोन भावांनाचाही त्याने खुन केला.
हे सुद्धा वाचा
नेमकं काय घडलं
उडपीत एकाच घरातील चार सदस्यांची हत्या करण्यात आल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. अफनान आणि तिची आई हसीना (46), भाऊ अयनाज (21) आणि असीम (12) यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता, अफनानच्या सहकारी असलेल्या प्रविणने हे हत्याकांड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.










