Thursday, October 15, 2026
Homeफलटणमुधोजी महाविद्यालयात आज ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन!

मुधोजी महाविद्यालयात आज ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन!

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम; प्रा. डॉ. सीता जगताप यांचे व्याख्यान

फलटण (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि ‘वाचन प्रेरणा दिन २०२६’चे औचित्य साधून फ. ए. सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग, विवेकवाहिनी आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाविद्यालयातील प्राचार्य शिवाजीराव भोसले सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. सीता जगताप या प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम असणार आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यातून व विचारांतून प्रेरणा घेण्याचा संदेश देणे हा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात, ज्ञानवृद्धीत आणि विचारक्षमतेच्या जडणघडणीत वाचनाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या समन्वयकपदी प्रा. डॉ. प्रभाकर पवार व प्रा. डॉ. अशोक शिंदे, तर सहसंयोजकपदी प्रा. शैला क्षीरसागर व डॉ. गौरी गायकवाड कार्यरत आहेत.

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या विशेष व्याख्यान कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच वाचनप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments