Friday, September 4, 2026
Homeसाताराचुरशीची निवडणूक: फलटण-कोरेगाव मतदारसंघातील 71.05% मतदान शांततेत पूर्ण

चुरशीची निवडणूक: फलटण-कोरेगाव मतदारसंघातील 71.05% मतदान शांततेत पूर्ण

फलटण :- फलटण-कोरेगाव (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील 14 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात आज लॉक झाले आहे. या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण, महायुतीचे सचिन पाटील, परिवर्तन महाशक्तीचे प्रा. रमेश आढाव आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे दिगंबर आगवणे यांच्यात चौकोनी सामना रंगला. मतमोजणीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

71.05% मतदानाची नोंद

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील 3,39,662 मतदारांपैकी 2,41,329 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदा 71.05% मतदानाची नोंद झाली असून, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. अंतिम आकडेवारीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मतदान प्रक्रियेचे नियोजन आणि नियंत्रण प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. अभिजित जाधव (तहसीलदार), प्रदीप शेडगे (गटविकास अधिकारी), आणि निखिल मोरे (मुख्याधिकारी) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सांभाळले.

महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण आणि महायुतीचे सचिन पाटील यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे, मात्र परिवर्तन महाशक्तीचे प्रा. रमेश आढाव आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे दिगंबर आगवणे यांची उपस्थिती निवडणुकीला अधिक चुरस देत आहे.

5 वाजेपर्यंतची आकडेवारी

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2,14,012 मतदारांनी मतदान केले होते. अंतिम मतदान टक्केवारी उशिरा निश्चित करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments