
Tharala Tar Mag 18 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता अर्जुन प्रियाची बाजू घेऊन सुभेदार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी भांडताना दिसणार आहे. अर्थात हा अर्जुन आणि सायलीचा एक प्लॅन आहे. आश्रम केस प्रकरणात प्रियाच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी अर्जुन आता मोठी रिस्क घेत आहे. त्याने प्रियाशी मैत्री आणि प्रेमाचं नाटक करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे प्रियाचा आपल्यावर विश्वास बसेल आणि ती आपल्याला सगळं खरं सांगेल, असं अर्जुनला वाटत आहे. दुसरीकडे, प्रिया देखील अर्जुनच्या या वागण्यामुळे खुश झाली आहे. तिला असं वाटत आहे की, अर्जुनच्या बहाण्याने आपण पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरात एन्ट्री मिळवू शकतो आणि पूर्णा आजीचं मन जिंकू शकतो.








