Wednesday, September 16, 2026
HomeUncategorizedफलटण शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार...

फलटण शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.

फलटण :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील रविवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.

प्रशासनाकडून फलटण शहर व पंचक्रोशीतील नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, लोकसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने दिनांक ०७/०५/२०२४ रोजी मतदान प्रकिया राबविणेत येत असलेने त्यानुशंगाने फलटण शहरामध्ये एकूण ४४ मतदान केंद्र आहेत, तसेच फलटण शहरामध्ये रविवार दिनांक ०५/०५/२०२४ रोजी संपुर्ण दिवसभर विविध पक्षाच्या सभा व रॅलीचे आयोजन करणेत आलेले आहे. त्यामुळे सदर दिवशी फलटण शहरात गर्दी होण्याची शक्यता नाकरता येत नाही, या करिता शहरातील कायदा व व्यवस्था राखणे कामी रविवार दिनांक ०५/०५/२०२४ रोजी होणारा आठवडी बाजार रद्द करणेत येत आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे अशी आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments