Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशTeam India | ISIS कडून धमकी मिळाल्यानंतर, भारतीय खेळाडूंना राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा...

Team India | ISIS कडून धमकी मिळाल्यानंतर, भारतीय खेळाडूंना राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा मिळणार | Navarashtra (नवराष्ट्र)

Team India | ISIS कडून धमकी मिळाल्यानंतर, भारतीय खेळाडूंना राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा मिळणार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ISIS कडून धमकी मिळाल्यानंतर, भारतीय खेळाडूंना राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा मिळणार

T-20विश्वचषकेवर भारतीय संघाच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यासंदर्भात नासाऊ काउंटीचे पोलिस आयुक्त पॅट्रिक रायडर यांनी संदर्भात स्पष्ट केले आहे.

भारतीय संघाची सुरक्षा : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये T-20 विश्वचषकाचा (T-20 World Cup 2024)  महामुकाबला होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेट जगतातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आहेत. आज 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर आमनेसामने असणार आहेत. भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध झाला या सामन्यामध्ये भारताच्या संघ 8 विकेट्सने विजय मिळवला. तर पाकिस्तानचा पहिला संघ यूएसएविरुद्ध झाला या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये सामना गमावला. त्यामुळे टीम इंडियाच्या खात्यामध्ये 1 विजय आहे तर पाकिस्तानने अजूनपर्यत विजयाचे खाते उघडले नाही. काही दिवसांपूर्वी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली होती. (फोटो सौजन्य – बीसीसीआय X अकाउंट) 

हे सुद्धा वाचा

या दोघांमधील सामन्यापूर्वी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेकडून धोका होता, ही बाब लक्षात घेऊन खेळाडूंच्या सुरक्षेत अनेक पटींनी वाढ करण्यात आली आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे सुरक्षा पुरवली जाईल असे सांगण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध बऱ्याच वर्षांपासून खराब आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचा ठरतो. या सामन्यापूर्वी सुरक्षेवर अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले जात होते. पण, सामन्यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या तसेच सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेवर भर दिला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments