Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रस्वाभिमान यात्रा: युगेंद्र पवार यांची बारामती दौऱ्याला सुरुवात

स्वाभिमान यात्रा: युगेंद्र पवार यांची बारामती दौऱ्याला सुरुवात

बारामती – “मला माझ्या काकांनी संधी द्यावी,” असे मत विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. बारामतीत विधानसभेचे वातावरण तापत असताना, युगेंद्र पवार यांची ‘स्वाभिमान यात्रा’ सुरू होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला दुसरा आमदार मिळावा, मग दोघांच्या कामाची तुलना करता येईल असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने आयोजित केलेल्या ‘स्वाभिमान यात्रेची’ सुरुवात उद्या (दि. १०) पासून होणार आहे. बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील मारुती मंदिर येथे सकाळी ९ वाजता दर्शन घेऊन युगेंद्र पवार यात्रेला सुरुवात करणार आहेत. यानंतर ते विविध गावांना भेट देणार असून, त्यांचा दौरा १२ दिवसांचा आहे.

यात्रेचा उद्देश बारामतीतील जनतेशी संवाद साधून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. युगेंद्र पवार म्हणाले, “महाराष्ट्राचा स्वाभिमान कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही.”

युगेंद्र पवार यांचा दौरा कार्यक्रम:

  • सकाळी ९:१५ वाजता माळावरच्या देवीचे दर्शन
  • पक्ष कार्यालयात १२ वाजता उपस्थिती
  • दुपारी २ वाजता मुढाळे येथील बैलगाडा शर्यतीस भेट
  • दुपारी ३ वाजता माळेगाव बुद्रुक
  • दुपारी ४ वाजता गोफणे व वाघमोडे वस्ती
  • सायंकाळी ५ वाजता माळेगाव कारखाना
  • सायंकाळी ६ वाजता येळे ढाळे वस्ती

यात्रेच्या माध्यमातून पवार जनतेशी संवाद साधणार असून, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जपवणूक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments