Friday, September 4, 2026
Homeसातारावंचित बहुजन आघाडीचे संघटनात्मक बळ; सुभाषराव गायकवाड यांची घरवापसी

वंचित बहुजन आघाडीचे संघटनात्मक बळ; सुभाषराव गायकवाड यांची घरवापसी

फलटणः सातारा जिल्हा पूर्व वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात अध्यक्ष भीमराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण जिल्हा, तालुका, शहर कार्यकारणी तसेच महिला व पुरुष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एकत्रित सभा पार पडली. या बैठकीत माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांची घरवापसी झाली आणि त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

गायकवाड यांच्या पुनरागमनामुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, एकमताने जोमाने कामाला सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त झाला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये ताकदीनं लढण्याची आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प केला.

विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत “जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय वंचित, जय संविधान” या घोषणांनी वातावरण भारावले. सर्व महापुरुषांना नमन करून बैठकीची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments