Solapur News : धक्कादायक! ड्युटी संपल्यावर रायफल घरी घेऊन जात पोलीसाने उचले टोकाचे पाऊल; गोळी झाडून घेत संपवले जीवन

0
14
Solapur News : धक्कादायक! ड्युटी संपल्यावर रायफल घरी घेऊन जात पोलीसाने उचले टोकाचे पाऊल; गोळी झाडून घेत संपवले जीवन


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल शिरसाट हे सोलापूर पोलिस दलात कार्यरत होते. त्यांच्याकडे एसएलआर रायफल होती. दरम्यान, मंगळवारी रात्री काम संपल्यानंतर शिरसाठ यांनी रायफल पोलिस शस्त्रआगारात जमा केली नाही. ही बंदूक काम संपल्यावर जमा करणे बंदनकारक आहेत. दरम्यान, राहुल शिरसाट यांनी रायफल जमा न करता त्यांनी ती घरी नेली. बुधवारी सकाळी घरी असतांना त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने कोणतेही पत्र लिहिलेले सापडलेले नाही. यामुळे त्याने आत्महत्या का केली या बाबत माहिती मिळू शकली नाही. हे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.



Source link