Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगचला तर मग कर्जत जवळच्या कोंडाणे लेणीवर…!

चला तर मग कर्जत जवळच्या कोंडाणे लेणीवर…!

फलटण :सेव बुध्दा केव अँड हेरिटेज , लेणी संवर्धक पुणे व संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून कर्जत जवळील कोंडाणे लेणीवर अभ्यास दौरा व वृक्ष रोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

अभ्यास दौऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातील मित्र Deepak Gaikwad यांनी आमंत्रित केले असून, त्यांनी नुकताच पुण्यात स्तुत्य असा बुध्दा फेस्टिव्हल आयोजित करून त्यातून पुणेकरांना लेणी बाबत माहीती करून देणारे प्रदर्शन आयोजित केला होता, नीस्वार्थपणे काम करणाऱ्या सतत प्रयत्नशील असलेल्या संघटनांना पाठबळ देण्यासाठी मोठ्याप्रमाणात आपण सर्वांनी उपस्थित रहा.

श्रीलंकेतून परतल्यानंतर हा पहिलाच लेणी अभ्यास दौरा आहे ,लेणी स्थापत्य शिल्पकला या बरोबरच श्रीलंकेतील बुध्द धम्माची ओळख आपण या अभ्यास दौऱ्यातून करून घेणार आहोत ज्या सदस्यांना या स्तुत्य उपक्रमात समाविष्ट होण्याची इच्छा आहे त्यांनी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवून घ्यायचे आहे.

तर लवकरच भेटू कोंडाणे लेणीवर…!

सूरज रतन जगताप

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments