Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगघरात बसून पंख्याखाली हवा खात फेसबुकवरून व्हॉट्स अपवर लिहून लेणीवरचे अतिक्रमण निघत...

घरात बसून पंख्याखाली हवा खात फेसबुकवरून व्हॉट्स अपवर लिहून लेणीवरचे अतिक्रमण निघत नाही त्यासाठी प्रत्यक्ष लेणीवर कृतिशील असावं लागतं.

फलटणःपावसाळ्यात मुंबई आणि परिसरातील तुरूणाई मोठ्याप्रमाणात कान्हेरी लेणीवर येत असतात लेणी परिसरातून वाहणाऱ्या ओढ्यातून भिजण्यासाठी, पण हीच तरूण मंडळी लेणीच्या अंधाराचा फायदा घेत अंधारात अश्लील कृत करतात व लेणीचे पावित्र्य नष्ट करतात, मागच्या रविवारी आव्हान केल्यानंतर काही मोजके मित्र पुढे आले आणि आम्ही लेणी परिसरात भिजण्यासाठी आलेल्या तरुणांना लेणीचे महत्व पटवून दिले व तिचे गांभीर्य समजून सांगितल्यानंतर थोडाफार फरक पडला पण त्याचे पडसाद काल दिनांक २१ जुलैच्या रविवारी दिसून आले, कालचा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे धम्म चक्र प्रवर्तन दिन वर्षावास प्रारंभीचा पहिलाच दिवस, या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवशी पाऊस धो कोसळत होता पण आमचे सोबती या कोसळणाऱ्या पावसात देखील कान्हेरी लेणीवर हजर होते.

आडवाटेला असलेल्या लेणीत जाऊन जोडपी एकतांचा दुरुपयोग तर करत नाहीत ना याची दखल स्वयंस्फूर्तीने आलेले अर्जुन काटे, विवेक वाघमारे , सिध्दार्थ गायकवाड आणि मित्र परिवार घेत होते , काल नेहमीप्रमाणेच लेणीवर गर्दी होती पण कोणीच लेणीचा दुरुपयोग करत नव्हते हे सकारात्मक चित्र होते, येवढ्या लवकर हे सर्व थांबणार नाही त्यासाठी दर रविवारी पावसाळा संपेपर्यंत जावे लागणार आहे.
त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे , माझी लेणी आहे , माझी राष्ट्रीय धरोहर आहे ते मीच पुढे येऊन संवर्धीत करणे आवश्यक आहे ही भावना जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात तयार होत नाही तोपर्यंत आपल्या वारसा स्थळांची अशीच दुर्दशा होणार आहे.
मागच्या काळात काय आणि कसे झाले हे आपल्याला माहीती नाही पण माझ्या समोर माझ्या वारसा स्थळांची दुर्दशा होणार नाही याची जाणीव प्रत्येकानेच आपल्या उरी बाळगायला हवी.
कालच्या धो कोसळणाऱ्या पावसात घरात आपल्या कुटुंब कबील्या बरोबर रविवारचा आपला मस्त दिवस व्यतीत करण्या ऐवजी दोन भगिनी काल कान्हेरी लेणीवर पोहोचल्या, कुसुम दोंदे/ चव्हाण आणि कामिनी सोनावणे , दोघीजणी उल्हासनगर वरून ट्रेनने प्रवास करून बोरीवलीतील कान्हेरी लेणीवर हजर होत्या, दोघींचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, केलेल्या आव्हानला प्रतिसाद देत या दोघीजणी लेणीवर आल्या होत्या , या दोघींचे मनापासून आभार 🙏🏻

अनेकांकडून लेणीवरील अतिक्रमण हटवा म्हणून केलेले लिखाण फेसबुकवरून वाचले आहे पण त्यांचे लेणीवरचे काम मात्र शून्य आहे, कृती शून्य लोकच जास्त लेणीवर न येता फेसबुकवरून व्हॉट्स अपवर लिहून बोंबाबोंब करत असतात, प्रत्यक्षात ते कधी लेणीवर जातात की नाही हा मोठा यक्ष प्रश्न आहे.

आम्ही पुढच्या रविवारी दिनांक २८ जुलै रोजी सकाळपासून लेणी क्रमांक २ मध्ये उपस्थित राहणार आहोत ज्यांना आपल्या पूर्वजांनी अथक परिश्रमपूर्वक निर्माण करून ठेवलेल्या वारसा स्थळासंदर्भात आत्मियता आहे त्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करत आहोत.

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments