Saturday, September 12, 2026
Homeसाताराश्रीराम साखर कारखान्याची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

श्रीराम साखर कारखान्याची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

फलटण: श्रीराम सहकारी साखर कारखान्याची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर 2024 रोजी खेळीमेळीत पार पडली. विधानसभेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, आमदार दीपक चव्हाण, संचालक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचे अध्यक्षस्थान कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी भूषवले.

सभेच्या प्रारंभी, कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेत असताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत कारखान्याला आर्थिक संकटातून सावरण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी सांगितली. त्यांनी सांगितले की, “तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी कारखाना बंद करण्याचा सल्ला दिला होता, मात्र आम्ही फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी तत्वावर कारखाना चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.” याचा परिणाम म्हणून, आज कारखाना कर्जमुक्त झाला असून भविष्यात तो आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या विविध योजना व उपक्रमांचा आढावा सादर केला. तर, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. फलटण तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments