Monday, September 14, 2026
Homeसाताराश्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी अजित पवार यांची भेट घेणार

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी अजित पवार यांची भेट घेणार

फलटण (प्रतिनिधी): विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर येत्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांच्या समस्या त्यांच्या समोर मांडणार आहेत. त्यानंतर फलटणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

खटके वस्ती, तालुका फलटण येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे कार्यकर्ते यांनी भाजप नेत्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल आणि खोट्या गुन्हे दाखल करून दबाव टाकण्याच्या कारवायांबद्दल जाहीरपणे आपली व्यथा मांडली होती. काही कार्यकर्त्यांनी महायुतीत राहून योग्य सन्मान मिळत नसल्यास, महायुतीतून बाहेर पडून पुढील राजकीय निर्णय घेण्याचा इशारा दिला.

या संदर्भात रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “येत्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या जातील. त्यानंतर जर त्यावर काही सकारात्मक बदल झाला नाही, तर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments