Sunday, August 23, 2026
Homeक्रीडाShardul Thakur : शार्दूल ठाकूर रणजीमध्ये चमकला; अवघ्या 21 धावांत 6 विकेटस्...

Shardul Thakur : शार्दूल ठाकूर रणजीमध्ये चमकला; अवघ्या 21 धावांत 6 विकेटस् | पुढारी

Shardul Thakur : शार्दूल ठाकूर रणजीमध्ये चमकला; अवघ्या 21 धावांत 6 विकेटस् | पुढारी

[ad_1]








नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दूल ठाकूर याने रणजी सामन्यांमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. कालपासून (शुक्रवार) सुरू झालेल्या आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात शार्दूल मुंबईकडून खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने दमदार गोलंदाजी केली आणि अवघ्या 21 धावांत 6 विकेटस् घेतल्या. त्याच्या दमदार गोलंदाजीमुळे मुंबईने आसामला पहिल्या डावात अवघ्या 84 धावांत गुंडाळले. (Shardul Thakur)

आयपीएलपूर्वी शार्दूलची ही गोलंदाजी खूप महत्त्वाची आहे. गेल्या काही सामन्यांत तो लयीत दिसला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पण त्याला काही खास करता आले नव्हते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतही त्याला एकच विकेट घेता आली होती. त्यामुळे दौर्‍यावरील दुसर्‍या कसोटीत त्याला संधी मिळाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही तो बाहेर आहे. यानंतर शार्दूलने रणजी सामने खेळून फॉर्म शोधण्याचा प्रयत्न केला आहे. (Shardul Thakur)

छत्तीसगडविरुद्धच्या शेवटच्या रणजी सामन्यात शार्दूलला गोलंदाजीने प्रभावित करता आले नव्हते. त्याला एकही विकेट मिळाली नव्हती; मात्र आता त्याने आसामविरुद्ध शानदार गोलंदाजी करत फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दाखवले आहेत. (शार्दूल ठाकूर )

हेही वाचा…









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments