
एका गँगस्टरच्या हत्येने पुण्यात खळबळ माजली आहे. तलवार गँगचा शहर परिसरात धुमाकूळ सुरु असतानाच पुन्हा एकदा दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने पुणे हादरले आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड परिसरातील सुतारदरा येथे गोळीबार करण्यात आला होता. अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर चार गोळ्या झाडल्या होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा, सुतारदरा, कोथरूड) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने मोहोळवर गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.






