Saturday, September 12, 2026
Homeसातारासातारा जिल्हा परिषद निवडणूक: संजीवराजे आणि शिवांजलीराजे नाईक निंबाळकरांनी कोळकी येथे मतदानाचा...

सातारा जिल्हा परिषद निवडणूक: संजीवराजे आणि शिवांजलीराजे नाईक निंबाळकरांनी कोळकी येथे मतदानाचा हक्क बजावला

फलटण: सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी आज फलटण तालुक्यातील कोळकी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केल्यानंतर संवाद साधताना संजीवराजे म्हणाले, “लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. आपला मतदानाचा हक्क हा आपल्या देशाच्या विकासाचे माध्यम आहे.”

या वेळी, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. निंबाळकर दाम्पत्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments