Wednesday, August 12, 2026
Homeसातारामहायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

फलटण – महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सुधाकर पाटील यांनी आज सहकुटुंब फलटण येथील मुधोजी क्लब मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

सचिन पाटील यांनी पत्नी आणि कुटुंबीयांसोबत मतदान करत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी सांगितले की, लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा आहे.फलटण मतदारसंघातील निवडणूक प्रचारात सचिन पाटील यांनी महायुतीच्या विकासाच्या अजेंड्यावर भर दिला आहे.

मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि मतदारांना आवाहन केले की, “आपल्या मताचा योग्य उपयोग करा आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवा.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments