रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटणमध्ये संघटन विस्तारासाठी सज्ज; ग्रामीण भागात शाखा विस्तार व लवकरच तालुका-शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी

0
2
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटणमध्ये संघटन विस्तारासाठी सज्ज; ग्रामीण भागात शाखा विस्तार व लवकरच तालुका-शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी

शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक; पक्ष बळकटीसाठी गावागावात संघटन उभारणीवर भर

फलटण | प्रतिनिधी. शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता फलटण येथील कोर्टासमोरील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या कार्यकर्त्यांची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, ग्रामीण भागात गावागावांत शाखा सुरू करणे तसेच आगामी काळात तालुका व शहर स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत पक्षाचे जिल्हा सचिव विजय येवले, जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय निकाळजे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शाखा स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पुढील दहा ते पंधरा दिवसांत तालुका व शहर स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. युवक, महिला आणि विविध समाजघटकांना पक्षाशी जोडून संघटन अधिक मजबूत करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

या बैठकीस विजय येवले, संजय निकाळजे, राजू मारुडा, तरडगावचे नितीन काकडे, युथचे सागर लोंढे, विशाल मोहिते, तेजस काकडे, राहुल काकडे, नितीन अहिवळे, पप्पू खराटे, दादा मोरे, सागर दशके, परविन शेळके, पारधी समाजाचे कबूल शिंदे, बाळासाहेब डोईफोडे तसेच महिला आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्षा श्रीमती विमलताई काकडे, उपाध्यक्षा मीनाताई काकडे, अलका बनसोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे यांनी दिली. बैठकीचा समारोप “जय भीम, जय संविधान” या घोषणांनी करण्यात आला.