
प्रभाग क्र. १० मध्ये नागरिकांना दिलासा; नगरसेविका मनीषा तिकोटे व नगरसेवक विलास काका क्षीरसागर यांच्याकडून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा
अकलूज | प्रतिनिधी :- उन्हाळ्यानंतरही सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वा खाली -अकलूज नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे व कर्तव्यदक्ष नगरसेवक विलास काका क्षीरसागर यांनी प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेत वैयक्तिक टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. या उपक्रमामुळे परिसरातील अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळत आहे.
प्रभागातील विविध भागांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, नागरिकांना कोणताही आर्थिक भार न पडता स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नगरसेविका सौ. मनीषा मोहन तिकोटे आणि नगरसेवक विलास काका क्षीरसागर यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत गरजेनुसार मोफत टँकर सेवा सुरू राहणार असल्याची माहितीही देण्यात आली.
या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्दल प्रभागातील नागरिकांनी दोन्ही लोकप्रतिनिधींचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.










