अकलूज प्रभाग क्र. २ मध्ये स्वखर्चातून मोफत पाणीपुरवठा; नगरसेविका प्रियंका गायकवाड व नगरसेवक सचिन देशमुख यांचा लोकहिताचा उपक्रम

0
1
अकलूज प्रभाग क्र. २ मध्ये स्वखर्चातून मोफत पाणीपुरवठा; नगरसेविका प्रियंका गायकवाड व नगरसेवक सचिन देशमुख यांचा लोकहिताचा उपक्रम

अकलूज प्रभाग क्र. २ मध्ये स्वखर्चातून मोफत पाणीपुरवठा; नगरसेविका प्रियंका गायकवाड व नगरसेवक सचिन देशमुख यांचा लोकहिताचा उपक्रम

अकलूज | प्रतिनिधी : उन्हाळ्यानंतरही कायम असलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २ मधील कार्यतत्पर नगरसेविका प्रियंका लखन गायकवाड आणि कर्तव्यदक्ष नगरसेवक सचिन देशमुख यांनी नागरिकांच्या सेवेसाठी स्वखर्चातून दोन पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत मोफत पाणीपुरवठ्याचा उपक्रम सुरू केला आहे.

प्रभागातील नागरिकांना दिवस-रात्र नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, कोणालाही पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये आणि पाणीटंचाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दोन टँकरच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागात नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

सामाजिक बांधिलकी जपत लोकप्रतिनिधींनी संकटकाळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहत स्वखर्चातून केलेल्या या मदतीमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी नगरसेविका प्रियंका लखन गायकवाड, नगरसेवक सचिन देशमुख तसेच नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे आणि उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे आभार व्यक्त केले असून, अशा लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक होत आहे.

पाणीटंचाईचे संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत हा मोफत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्धार संबंधित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला असून, नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.