
अशावेळी दीपा राग आल्याचं नाटक करून कार्तिकला जीवे मारण्याची धमकी देणार आहे. जर, तू आयेशाशी लग्न केलंस तर, मी मंडपातच तुझा जीव घेईन, अशी धमकी दीपा कार्तिकला देणार आहे. दीपाची धमकी ऐकून आयेशा देखील घाबरणार आहे. मात्र, आता तरी ती खरं सत्य सांगेल का? हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.








