सचिन देशमुख यांचा लोकहिताचा उपक्रम; स्वखर्चातून प्रभाग क्रमांक २ मध्ये दिवस-रात्र मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा

0
3
सचिन देशमुख यांचा लोकहिताचा उपक्रम; स्वखर्चातून प्रभाग क्रमांक २ मध्ये दिवस-रात्र मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा

सचिन देशमुख यांचा लोकहिताचा उपक्रम; स्वखर्चातून प्रभाग क्रमांक २ मध्ये दिवस-रात्र मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा

अकलूज | प्रतिनिधी

उन्हाळा संपल्यानंतरही अकलूज शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या कायम असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक सचिन देशमुख व नगरसेविका प्रियका लखन गायकवाड हे नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरसेवक सचिन देशमुख यांनी स्वखर्चातून दोन पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत दिवस-रात्र मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.

या उपक्रमामुळे प्रभागातील पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. नियमितपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापरासाठीही पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे.

नगरसेवक सचिन देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या खर्चातून हा लोकहिताचा उपक्रम सुरू केला असून, त्यांच्या या सेवाभावी कार्याचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अनेकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

पाणीपुरवठ्याची परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत गरजेनुसार मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांना मोठा आधार मिळाला असून, सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श निर्माण झाला आहे.