
भाजपचे प्रदेशाध्यक्ष शुभेंदू अधिकारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून रामेंदू यांच्या विधानाचा निषेध केला आहे. ‘ही टीएमसी नेत्यांची भाषा आहे. तृणमूल काँग्रेसचं नेतृत्व प्रभू रामचंद्रांचा किती आदर करतं हेच त्यांनी दाखवून दिलं आहे. मी केवळ त्यांच्या वक्तव्याचा निषेधच करणार नाही, तर जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या या वक्तव्याबद्दल तक्रारही दाखल केली आहे,’ असं अधिकारी यांनी म्हटलं आहे.








