Raj Thackeray : वडापाव पाहिला की राज्य सरकारची आठवण येते, यातील वडा कोण तेच कळत नाही; राज ठाकरेंची मिश्किल टोलेबाजी

0
22
Raj Thackeray : वडापाव पाहिला की राज्य सरकारची आठवण येते, यातील वडा कोण तेच कळत नाही; राज ठाकरेंची मिश्किल टोलेबाजी

मुंबईतील गोरेगावात वडापाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात राज ठाकरेंनी राज्य सरकारला वडापावची उपमा दिली. मागील एक वर्षापासून मला वडापाव पाहिला की राज्य सरकारची आठवण येते असं म्हणत राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वडा अजित पवार आहे, की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वडा एकनाथ शिंदे आहे की, या दोघांमधला वडा देवेंद्र फडणवीस आहेत, हेच कळत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

Source link