
अयोध्येत राममूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना
दरम्यान, अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात आज प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा विधी झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल हे उपस्थित होते.






