
फौजदारी संहिता प्रक्रिया १९७३च्या कलम १४४ नुसार विद्यापीठ आणि सभोवतालच्या शंभर मीटर परिसरात विद्यार्थ्यांशिवाय इतर व्यक्तींना एकत्र येण्यास, विद्यापीठात प्रवेश करण्यास प्रतिबंध, विद्यापीठ परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पोलिस अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांना वगळण्यात आले आहे. या सोबतच विद्यापीठ परिसरात ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास, विद्यापीठ परिसरात कोणताही आक्षेपार्ह, दोन गटात वाद होईल असा मजकूर लिहिण्यास आणि छापील मजकूर चिकटवण्यास मनाई करण्यात आली आहे.








