
Pune Petrol Diesel Dealers Association : हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनने संप घोषित केला आहे. यामुळे राज्यात इंधन टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तीन दिवस यामुळे पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने पुण्यात काल पेट्रोल भरण्यासाठी झुंबड उडाली होती. पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नसल्याहे असोसिएशन जाहीर केले असून यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत.





