
दरम्यान, ही घटना गावात कळली तेव्हा तातडीने त्यांना वाचवन्यासाठी बचाव मोहीम राबवण्यात आली. बचाव पथकाने बोगद्यात उतरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एका मोठ्या क्रेनच्या मदतीने काही माणसे या बोगद्यात उतरली आणि त्या दोघांचा शोध घेतला गेला. बुधवारी ही शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास दोन्ही शेतकऱ्यांचे मृतदेह बचावपथकाला मिळाले. या घटनेमुळे काझड गावावर शोककळा पसरली आहे.





