
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणरायाची प्रतिष्ठापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी होणार आहे. प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून आकर्षक फुलांनी सजविलेल्या हनुमान रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. आप्पा बळवंत चौक, लिंबराज महाराज चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा, हुतात्मा बाबू गेनू चौक मार्गे मिरवणीूक उत्सव मंडपात येईल. ट्रस्टने साकारलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीवरील विद्युत रोषणाईचे उदघाटन सायंकाळी सात वाजता केले जाणार आहे.






